![]() |
मराठी विभाग |
माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील सरुडकर शिक्षण संस्थेचे, श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरुड ची स्थापना १९८३ साली झाली. शाहूवाडी तालुक्यातील गोर-गरीब, शेतकरी, मजूर यांची मुले शिक्षणापासून वंचित होती. अशा सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम माजी आमदार बाबासाहेब पाटील तथा दादा यांनी केले.
महाविद्यालयात इतर विभागांबरोबरच मराठी विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागातून दरवर्षी अनेक विद्यार्थी पदवी ग्रहण करून उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी सक्षम होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मयाची गोडी निर्माण करण्यासाठी मराठी विभाग सदैव तत्पर असतो.
No comments:
Post a Comment