My Blog List

‘नवीन शैक्षणिक धोरण सप्ताह’

 माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील सरुडकर शिक्षण संस्थेचे, 

श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड

ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर

अर्थशास्त्र, इतिहास व मराठी विभाग आयोजित

‘नवीन शैक्षणिक धोरण सप्ताह’

दि.- २४ जुलै, २०२३ ते २९ जुलै, २०२३

       दि. २७ जुलै २०२३

  श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड येथे नवीन शैक्षणिक धोरण सप्ताह दि. २४ जुलै २०२३ ते २९ जुलै २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला. या सप्ताह अंतर्गत महाविद्यालयातील इतिहास, अर्थशास्त्र व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ जुलै २०२३ रोजी व्याख्यान आयोजित केले होते.


  यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मराठी विभागाचे प्रा. आर. ए. मुडळे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांची ओळख अर्थशास्त्र विभाग प्रा. पी. पी. देशमुख यांनी केली. प्रमुख वक्ते प्रा. टी. व्ही. स्वामी (विश्वस्त शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा) कोल्हापूर,) यांनी नवीन शैक्षणिक धोरण याबाबत बोलताना नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वपूर्ण पैलूवर प्रकाश टाकला, याबाबत बोलताना त्यांनी शिक्षण हे आता आवडीने आणि सवडीने घेता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणातून व्यावसायाभिमुख तसेच कौशल्यपूर्ण शिक्षण घेता येणार आहे. या नवीन धोरणातून होणारे फायदे तोटे याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली, नवीन बदलामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले, शेवटी त्यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल असणाऱ्या शंकांचे निरसन केले. 


   कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.टी. दिंडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपले विचार मांडलेत. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर-कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्रा. आर. के. गायकवाड आणि प्राध्यापिका जे. बी. हारुगडे यांनी केले, तर आभार अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही. एम. कुरणे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment